जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे २५ बळी

Courtesy: Social Media

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या १८० झाली आहे. सोमवारी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या २५ वर पोहोचली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेले.

नवे रुग्ण हे जळगाव शहरातील चार तर भुसावळ शहरातील चार आहेत. आता या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.

हे ही वाचा…उद्धव ठाकरे परप्रांतीयांसाठी ट्रेन सोडा, असं सांगत असताना देवेंद्र फडणवीस कुठं होते?

खडसे कोणत्या पक्षात जाणार? निर्णय लॉकडाऊन नंतर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नोकरदार, पाहा किती आहे संपत्ती?

हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपालांची भेट

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे यावर चर्चा करयासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अधिकारी उपस्थित होते . बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरत कोविड रुग्णालयात भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. यात सत्ताधारी शिवसेनेच्रया आमदारांनी कोरोना वाढीला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप केला.