Home > News Update > कोरोनावरील 8 लसींची वैद्यकीय चाचणी सुरू- WHO

कोरोनावरील 8 लसींची वैद्यकीय चाचणी सुरू- WHO

कोरोनावरील 8 लसींची वैद्यकीय चाचणी सुरू- WHO
X

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जगात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण तरीही आता जगातील रुग्णांची संख्या 46 लाखांवर गेली आहे. कोरोनावर अजूनही औषध शोधता आलेले नाही. पण आता जगभरात कोरोनाच्या 8 लसींची वैद्यकीय चाचणी सुरू झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिली आहे. तर कोरोनावर प्रभावी ठरतील अशा 110 लसींवरील काम सध्या विविध टप्प्यांवर सुरू आहे.

अमेरिका, जर्मनी आणि चीन या संशोधनाच्या कामाचे नेतृत्व करत आहेत. चीन आणि अमेरिकेने तर लस कधीपर्यंत तयार होईल याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. मार्च 2021 पर्यंत ही लस तयार होईल असे चीनने जाहीर केले आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेत लस तयार होईल असे नुकतेच जाहीर केले आहे.

एकंदरीतच या लसींची चाचणी आणि त्यांचे निष्कर्ष या सगळ्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्षात ही लस बाजारात येण्यासाठी पुढचे वर्ष उजाडेल असे दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे उपाय अंमलात आणणे जास्त महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.

Updated : 17 May 2020 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top