राज्यातील 786 पोलिसांना कोरोनाची लागण, 7 पोलिसांचा मृत्यू

Courtesy: Social Media

कोरोनाचा प्रसार ऱोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली. पण आता कोरोनाच्या विषाणूने पोलीस दलात शिरकाव केलाय. राज्यभरात आतापर्यंत 786 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्य पोलीस दलातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार 88 पोलीस अधिकारी आणि 698 इतर पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 13 अधिकारी आणि 63 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या 703 कोरोनाबाधीत पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा…


इकडे आड तिकडे विहीर…! मजूरांनी कुठं जावं?

Jitendra Awhad is Back: ‘कोरोना’शी यशस्वी झुंज!

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाहीच!

कॉंग्रेसकडून राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर

नवी मुंबईतील APMC मार्केट सोमवारपासून आठवडाभर बंद

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ल्यांच्या 200 घटना घडल्या असून याप्रकरणी आतापर्यंत 732 जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.