Home > News Update > लॉकडाऊन काळात ५३० सायबर गुन्हे दाखल; २७४ जणांना अटक

लॉकडाऊन काळात ५३० सायबर गुन्हे दाखल; २७४ जणांना अटक

लॉकडाऊन काळात ५३० सायबर गुन्हे दाखल; २७४ जणांना अटक
X

मुंबई दि.१० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५३० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ८ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप- १९९ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २२३ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १५ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७४ आरोपींना अटक.

■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ मुंबई शहरांतर्गत बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे या विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ३२ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात एका व्यक्ती विरुद्ध बदनामी कारक आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या ट्विटर प्रोफाईल वर पोस्ट केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

हे ही वाचा..

कोविडसंदर्भात १ लाख ६१ हजार गुन्हे दाखल; २९ हजार ९९० व्यक्तींना अटक

‘वंदेभारत’ अभियान : २२४ विमानांनी ३३ हजार ९७७ नागरिक मुंबईत दाखल

…तर पुन्हा लॉकडाऊन: अजित पवार

Source: Maharashtra Govt now

Updated : 11 July 2020 2:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top