Home > News Update > #कोरोनाशी_लढा- मुंबईच्या मदतीसाठी राज्यभरातून कुमक

#कोरोनाशी_लढा- मुंबईच्या मदतीसाठी राज्यभरातून कुमक

#कोरोनाशी_लढा- मुंबईच्या मदतीसाठी राज्यभरातून कुमक
X

संपूर्ण देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण असलेल्या मुंबईत आता आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. तसंच राज्यातील इतर जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्य कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला.

हे ही वाचा...

आनंदाची बातमी: ‘हा’ पूर्ण जिल्हा झाला कोरोना मुक्त, जिल्ह्यात आज एकही रुग्ण नाही…

टाळेबंदीचा अतिरेक नको!

Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावीतून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Updated : 12 Jun 2020 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top