Home > News Update > देशाच्या अर्थव्यवस्थेवर 'या' बाबी देखील करु शकतात परिणाम...

देशाच्या अर्थव्यवस्थेवर 'या' बाबी देखील करु शकतात परिणाम...

देशाच्या अर्थव्यवस्थेवर या बाबी देखील करु शकतात परिणाम...
X

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था नक्की कोणत्या बाबीवर अवलंबून असते? अर्थव्यवस्थांवर कोणत्या गोष्टी निर्णायक परिणाम करू शकतात. हे कोणी डाव्या अर्थतज्ञांने नाही तर आयएमएफ / नाणेनिधी सांगत आहे.

या बाबीवर नजर टाकल्यास ही बाब आपल्या लक्षात येईल.

“जीडीपी” (GDP) च्या झम च्या बडबडीने स्वतःचा ब्रेनवॉश करून घ्यायला नकार द्या. कोणत्याच देशाची वा जगाची अर्थव्यवस्था निर्वात पोकळीत कार्य करत नाही. सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय, लष्करी, वित्तीय अशा असंख्य शक्ती अर्थव्यवस्थेवर आणि परस्परांवर कुरघोडी करत असतात.

(अ ) भू-राजनैतिक तणाव : जगातील काही “ज्वलनशील भूभागात” कधीही युद्धाचा भडका उडू शकतो. उदा. अमेरिका इराणमधील गंभीर ताणतणाव…

ब) देशांतर्गत ताणतणाव : जगातील अनेक देशात सामाजिक, राजकीय असंतोष खदखदत आहेत. चिघळत राहणाऱ्या सामाजिक असंतोषामुळे राज्यकर्त्याबद्दलच्या विश्वासाला तडा जातो. त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकतो.

(क) स्वसंरक्षणात्मक पवित्रे : अनेक देश दुसऱ्या देशातून येणाऱ्या आयातमालाला विविध अडथळे उभारण्याच्या मानसिकतेत आहेत. यात आयातकर वाढवणे, मालाच्या गुणवत्तेबद्दल खुसपट काढणे. याचा परिणाम जागतिक व्यापारावर होईल.

(ड) पर्यावरणीय अरिष्टे : वातावरण बदलामुळे जगातील विविध भूभागात वादळे, महापूर, जंगलातील वणवे, दुष्काळांचे प्रमाण वाढते आहे. यातून मनुष्यहानी, आरोग्यावर परिणाम व नागरिकांची रोजगाराची साधने नष्ट होण्यामुळे उत्पादन व उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो.

(इ) वित्तीय मार्केटवर परिणाम: वरील सर्व घटना भांडवलाच्या गुंतवणूकीचे व निर्गुंतवणुकीचे निर्णय प्रभावित करतात. भांडवल विकसनशील देशांमधून “सुरक्षित” ठिकाणी नेले जाते. त्याचा विपरीत परिणाम त्या देशाच्या विनिमय दरावर, कंपन्यावर व शासनाच्या वित्तीय स्थिरतेवर होऊ शकतो.

(ई) एकाचवेळी सर्वत्र येणारी मंदी : नजीकच्या भविष्यात एकाचवेळी सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदीची (सिंक्रोनाइज्ड स्लोडाऊन) लागण होऊ शकते.

संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार

Updated : 27 Feb 2020 3:46 AM GMT
Next Story
Share it
Top