VIDEO: धक्कादायक! बीड मध्ये चार कोरोनाग्रस्त रुग्णांवर गुन्हा दाखल

प्रातिनिधीक

होम क्वारंटाईन असतानाही कोरोनाबाधीत रुग्ण घराबाहेर पडून शहरात मोकाट फिरल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे.कोरोना बाधीत रुग्ण शहरात शॉपिंग करत हिंडले शिवाय दोन लग्नांना देखील उपस्थिती लावल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बाधीत असतानाही शहरात बिनधास्त फिरल्यामुळे 4 रुग्णांसह 45 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मशीदीमध्ये लग्नाचे आयोजन करणाऱ्या मुलामुलींच्या वडिलांविरोधात देखील बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधिकारी गजानन जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी….