Home > News Update > कोरोनाविरुद्ध युद्ध- राज्यात ३४ पोलीस शहीद

कोरोनाविरुद्ध युद्ध- राज्यात ३४ पोलीस शहीद

कोरोनाविरुद्ध युद्ध- राज्यात ३४ पोलीस शहीद
X

कोरोचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आणि राज्यातील पोलिसांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली. लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे आणि कोरोनाची संसर्ग साखळी तोडावी यासाठी पोलीस योद्धे मैदानात कार्यरत आहेत. पण दुर्दैवाने आतापर्यंत या १४३७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ३४ झाली आहे.

#राज्यात ३४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई - २० पोलीस आणि १ अधिकारी, एकूण २१

पुणे - २

सोलापूर शहर - २

नाशिक ग्रामीण - ३

ए.टी.एस. - १

मुंबई रेल्वे - १

ठाणे ग्रामीण - २

जळगाव ग्रामीण - १

पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सध्या १९६ पोलीस अधिकारी आणि १२४१ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात सध्या एकूण ३१० रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १६,७२८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाने नियमांचे आणि सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Updated : 9 Jun 2020 1:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top