जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात 30 नवे रुग्ण

Courtesy: Social Media

मालेगाव आता जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आणखी तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 381 वर पोहचलीय,तर जळगाव शहरातील रुग्णांची संख्या 100 च्या जवळ पोहोचली आहे.

जळगाव शहरासह भुसावळ, यावल, पाचोरा, एरंडोलममधील 108 कोरोना संशयितांची तपासणी अहवाल आले असून त्यापैकी 30 जण कोरोना पॉझिटिव्ह तर 78 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगावातील 26, भुसवाळमधील 3 तर एरंडोलमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.