Home > News Update > कोरोनाचा फटका: देशातील २७ कोटी ५० लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

कोरोनाचा फटका: देशातील २७ कोटी ५० लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

कोरोनाचा फटका: देशातील २७ कोटी ५० लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
X

कोरोनाचे संकट आणि त्यानंतर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे देशभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सुमारे 24 कोटी 70 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची माहिती युनिसेफच्या अहवालातून उघड झाली आहे.

त्याचबरोबर अंगणवाडी मध्ये जाणाऱ्या सुमारे दोन कोटी 80 लाख विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसल्याचे या अहवालातून समोर आलेले आहे. तर कोरोना संकटाच्या आधी देखील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या सहा कोटी होती. या विद्यार्थ्यां व्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झालेला आहे.

पण या अहवालामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक देखील केलेले आहे. वेब पोर्टल,टीव्ही कार्यक्रम, ई पाठशाळा, विविध मोबाईल ॲप यासारख्या इतर ऑनलाईन माध्यमांमधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील असे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. दरम्यान एनसीईआरटीने पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक कॅलेंडर तयार केलेले आहे आणि यामध्ये काही नवीन मार्गदर्शक सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत.

हे ही वाचा..

सदोष बियाणे बनविणाऱ्या कंपनींवर कडक कारवाई करा: नाना पटोले

कापसाच्या शेतीचे अर्थकारण, शेतकरी व आपले लोकप्रतिनिधी!

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ… जबाबदार कोण?

दरम्यान कोरोच्या संकटामुळे गरिबांना सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे आणि अशा वर्गातील मुलांसाठी सरकारने विविध सामाजिक उपयोजना केल्या तर त्यांच्या परिवाराला अन्न मिळू शकेल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होऊ शकेल असे देखील या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान युनिसेफच्या भारतातल्या प्रतिनिधींनी भारतामध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण सुमारे चार कोटी असल्याचे म्हटले आहे आणि त्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज देखील व्यक्त केलेली आहे.

दरम्यान दक्षिण आशियामध्ये सुमारे साठ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याची माहिती देखील युनिसेफने दिलेली आहे.

Updated : 24 Jun 2020 4:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top