कोरोना व्हायरस जळगाव: भुसावळ मध्ये का वाढतायेत कोरोना चे रुग्ण?

313

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव जिल्ह्यात आता गेल्या 24 तासात कोरोनाचे 14 नवीन रुग्ण आढळल्याने आतापर्यंत एकूण 258 कोरोना बाधित रूग्ण झाले आहेत. तर 30 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जळगाव शहरासह भुसावळ, पारोळा आणि चोपडा इथल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींच्या चाचणीचे अहवाल शनिवारी आले. यात 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील चार आणि भुसावळ इथल्या दहा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. जळगावमध्ये वाढत्या रुग्ण संख्येनं जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले असले तरी नागरिक नियम पाळत नसल्याचे दिसत आहे.