पुणे शहरात 24 तासात 202 नवे कोरोनाबाधीत रुग्ण

Courtesy: Social Media

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत 269 ने वाढ झाली आहे. यातील 202 रुग्ण हे एकट्या पुणे शहरातील आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 436 झाली आहे तर पुणे शहरातील रुग्णांची संख्या 4 हजार 676 वर पोहोचली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी दिवसभरात 46 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. काँटोन्मेन्ट आणि नगरपालिका हद्दीत 8 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 264 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात पुणे शहरातील 235 लोकांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 902 आहे. यातील 2 हजार 473 रुग्ण पुणे शहरातील आहेत. पुणे जिल्ह्यात गंभीर प्रकृती असलेले 207 रुग्ण आहेत. यात पुणे महानगरपालिका हद्दीतील 170, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 14 आणि पुणे ग्रामीणमधील 23 रुग्णांचा समावेश आहे.