मुंबईत बंदोबस्तावरील पोलिसांवर माथेफिरुचा कोयत्याने हल्ला !

Strict enforcement of rules in hotspot area
Courtesy: Social Media

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असल्याने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करुन युद्ध पातळीवर काम करत आहेत. पण शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास मरीन ड्राइव्हवर एक व्यक्ती फिरत असताना पोलिसांनी त्याला हटकले.

पण तो थांबला नाही. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर त्याने कोयत्याने हल्ला केला, यात ते दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला जखम झाली आहे. पण अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.