Home > News Update > ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात गुंडांचा धुमाकूळ

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात गुंडांचा धुमाकूळ

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात गुंडांचा धुमाकूळ
X

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगरमध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून काही गुंडांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. आनंदनगर परिसरातील रहिवासी शैलेश वाढवणे आणि त्यांचे भाऊ रात्री साडे बाराच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असताना, रस्त्यात काही जण एका कारचालकाला मारहाण करत असल्याचे त्यांनी दिसले. त्यानंतर त्या गुडांनी या दोन्ही भावांची गाडी थांबवली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांची गाडी लाथ मारुन पाडली. त्यानंतर या दोन्ही भावांना त्यांनी विनाकारण मारहाण करण्यास सुरूवात केली. दोन्ही भावांनी या गुंडांचा प्रतिकार करण्यास सुरूवात केल्यानंतर ते ५-६ गुंड पसार झाले आहेत.

यानंतर पीडितांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. तसेच तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे कासारवडवली पोलीस स्टेशन हे घटना घडली त्या ठिकाणापासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवर परिसराचा वेगाने विकास होतो आहे. इथं रहिवासी वस्त्या वाढत आहेत. मोठमोठी गृहसंकुलं उभी राहत आहेत. पण त्याचबरोबर या परिसरातील आतल्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी शुकशुकाट असल्याने त्यावर काही ठिकाणी नशा करणारे लोक असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे या घटनेमुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Updated : 24 Sep 2022 11:02 AM GMT
Next Story
Share it
Top