पुणे जिल्ह्यात 24 तासात 193 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू

Courtesy: Social Media

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे 193 नवे रुग्ण आढळले आहेत. तर यातील 154 रुग्ण एकट्या पुणे शहरात आढळले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 5 नवीन रुग्ण आढळले आहेत.

काँटोन्मेंन्ट आणि नगरपालिका क्षेत्रात 24 तासात वाढलेली संख्या 29 तर पुणे ग्रामीणमध्ये 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पुणे जिल्ह्यात 24 तासात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 8 मृत रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. तर उर्वरित 2 मृत रुग्ण हे पिपरी चिंचवड शहरातील आहेत. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे पुणे जिल्ह्यात 24 तासात तब्बल 115 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

यातील 110 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. तर 5 रुग्ण हे ग्रामीण क्षेत्रातील आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 370 झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2 हजार 184 पर्यंत पोहचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यं 221 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यातील 195 मृत्यू हे पुणे शहरात झाले आहेत.