अमेरिकेत निदर्शनांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका

Courtesy: Social Media

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड (George Floyd) या व्यक्तीच्या पोलीस कस्टडीतील मृत्यूमुळे अमेरिकेत (Americas) सुरू झालेले आंदोलन आता अनेक शहरांमध्ये पसरल्याने कर्फ्यू (Curfew) लागू करण्यात आला आहे. जॉर्ज फ्लॉइडला न्याय मिळावा यासाठी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पण आता या आंदोलनामुळे अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा…


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

महाराष्ट्र कोरोनावरील लस विकसित करणार, 30 माकडांवर प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, ‘हे’ आहे कारण…

‘निसर्ग’ संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

कारण गेल्या २४ तासात अमेरिकेत कोरोनाचे १५ हजार ८४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात तब्बल ८६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाखांच्यावर आहे. तर मृतांची संख्या १ लाख ४ हजारांच्या पुढे गेली आहे. १८ लाख रुग्णांपैकी सुमारे साडे सहा लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संतप्त आंदोलकांनी व्हाईट हाऊसमध्ये (white house) प्रवेश केल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना बंकरमध्ये लढण्याची वेळ आली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी परिस्थिती आटोक्यात आली नाही तर लष्कराला बोलावण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे अमेरिकेत आंदोलनाच्या नावाखाली केला जाणारा हिंसाचार खपवून घेणार नाही असेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.