Home > News Update > चिंताजनक: देशातील कोरोना बळींची संख्या 14 हजारांच्यावर

चिंताजनक: देशातील कोरोना बळींची संख्या 14 हजारांच्यावर

चिंताजनक: देशातील कोरोना बळींची संख्या 14 हजारांच्यावर
X

गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाचे 14 हजार 933 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 312 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 14 हजार 011 एवढी झालेली आहे.

तर आतापर्यंत चार लाख 40 हजार 215 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे या एकूण रुग्णांपैकी दोन लाख 48 हजार 190 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. तर एक लाख 78 हजार चौदा रुग्णांवर सध्या देशात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा..

अमेरिकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का, ट्रम्प यांचा मोठा निर्णय

संघर्ष: दोन वर्षाचा चिमुकला जेव्हा कोरोनाशी दोन हात करतो…

देव तारी त्याला कोण मारी? कोविड रुग्णालयात महिलेने दिला बाळाला जन्म

चिंतेची बाब म्हणजे एकीकडे सरकार अनलॉक दोनची तयारी करत असताना गेल्या तीन दिवसात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या जवळपास 45 हजारांनी वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 24 तासात 15 हजारांच्यावर नोंदवली गेली होती. गेल्या दोन दिवसांपासून हीच संख्या चौदा हजार ते पंधरा हजारांच्या दरम्यान नोंदवली जात आहे.

Updated : 23 Jun 2020 6:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top