जळगावात स्मशानभूमीतही वेटिंग, प्रशासनाचा विद्युतदाहिनाचा प्रस्ताव

643

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढतच चालला आहे. जळगाव जिल्ह्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गुरुवारी आणखी नवीन 1100 रुग्ण आढळून आले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 35 हजारांवर लोक कोरोनाबाधीत झाले आहेत तर मृतांची संख्या हजाराच्या जवळ पोहोचली आहे.

सरकारी रुग्णालयं फुल्ल झाली आहेत, बाधीत रुग्ण वेटिंगवर आहेत. तर खासगी रुग्णालयंही अपुरी पडत आहेत. मृतांच्यी संख्या वाढल्याने स्मशानभूमी कमी पडत आहे म्हणून आता प्रशासनाने विद्युतदाहिनीचा प्रस्ताव दिला आहे.

Comments