विनाकागदपत्रं शिवभोजन थाळी !

प्रजासत्ताक दिनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १० रुपयातल्या शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) योजनेला सुरूवात केली. गेल्या दोन दिवसात या थाळीला सामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

ही थाळी घेण्यासाठी आधारकार्ड किंवा ओळखपत्र लागेल अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात कोणत्याही कागदपत्रांशिवाय सामन्यांना १० रुपयात जेवण उपलब्ध होतंय. या शिवभोजन थाळी योजनेची अंमलबजावणी कशी होतेय आणि सामान्यांना या थाळीबद्दल काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी……