Home > News Update > ‘या’ जिल्ह्यात एका वर्षात 10 हजार लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा !

‘या’ जिल्ह्यात एका वर्षात 10 हजार लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा !

‘या’ जिल्ह्यात एका वर्षात 10 हजार लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा !
X

अलिकडच्या काळात देशभक्ती आणि देशद्रोह हे शब्द तुमच्या कानावर जरा जास्तच पडत असतील. मात्र, तुम्ही एका जिल्ह्यातील तब्बल 10 हजार लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झालं असल्याचं कधी ऐकलं आहे का? मात्र, असं घडलं आहे. झारखंड राज्यातील खूंटी जिल्ह्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गुन्हे अज्ञात आदिवासी लोकांवर दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी जून २०१७ ते जुलै २०१८ दरम्यान दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये १९ एफआयआर मध्ये ११,२०० लोकांनी सामाजिक शांतता भंग करण्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे १४ खटल्यांमध्ये १०,००० पेक्षा अधिक लोकांवर IPC (भारतीय दंड संहिता) च्या कलम १२४ नुसार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे हि वाचा...

वरंधा घाटातील वाहतुक चार महिन्यांपासुन ठप्प

शेतकरी व्यथा मांडत होता… जिल्हाधिकारी त्याला ड्रामा म्हणाले

विद्यापीठ नावाची गोष्ट…

वकिल सुनील विश्वकर्मा यांनी ‘आदिवासी न्याय मंच’ या संस्थेच्या वतीनं या अज्ञात आदिवासींविरूद्ध दाखल केलेल्या खटल्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. तसंच ही सर्व प्रकरण एका तपास यंत्रणेकडे सोपविण्यात यावी, अशी विनंती वकिल सुनील विश्वकर्मा यांनी न्यायालयात एका याचिकेद्वारे केली आहे.

उच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून झारखंड सरकार आणि राज्य पोलिसांना नोटीस पाठविली आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी प्रलंबित आहे.

न्यूज़ वेबसाइट ‘स्क्रॉल डॉट इन’ यांनी या संदर्भात वृत्त प्रकाशीत केलं आहे.

Updated : 20 Nov 2019 11:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top