Home > News Update > लोकशाही मध्ये तानाशाही ला जागा नसते, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा...

लोकशाही मध्ये तानाशाही ला जागा नसते, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा...

लोकशाही मध्ये तानाशाही ला जागा नसते, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा...
X

आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार 2 च्या निमित्ताने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी राऊत यांनी मोदी सरकारच्या काही कामाचं कौतुक केलं. तसंच आता ही वेळ राजकारणाची नाही. असं म्हणत केंद्र सरकारवर टीका करण्याचं टाळलं. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा तसंच केंद्रीय आरोग्यमंत्र्यामध्ये संवाद आहे. कोरोना च्या लढाईत केंद्राचं पूर्ण सहकार्य आहे. अशी माहिती यावेळी राऊत यांनी दिली.

त्यानंतर राऊत यांना युती तुटून काही महिने झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेतील द्वेष संपला का? असा सवाल केला असता, राऊत यांनी

ही द्वेषाची बाब नाही. आम्ही कधीही कोणाच्या बाबत द्वेष ठेवला नाही. या दोन तीन महिन्याच्या काळात राहुल गांधी यांनी चांगल्या बाबी सांगितल्या. चांगल्या योजना मांडल्या. तेव्हा ही आम्ही मोदीजींना सांगितलं होतं. या संदर्भात मी सामनात पण लिहिलं होतं. की राहुल गांधींचंही म्हणणं ही आपण ऐकलं पाहिजे. ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी लॉकडाऊन च्या बाबतीत काही बाबी मांडल्या आहेत. ज्या लॉकडाऊन च्या बाबतीत असतील, बेरोजगारांच्या बाबतीत असतील, आर्थिक स्थितीच्या बाबतीत असतील, न्याय योजनेच्या बाबतीत असतील.

देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नात्याने तुम्हाला त्यांचं म्हणणं ही ऐकायला हवं. त्यांच्यासोबतही चर्चा व्हायला पाहिजे. तरच देश या संकटाच्या काळात पुढं जाईल. ही बाब देखील मी मांडली आहे. हा द्वेष नाही. द्वेष का ठेवायचा?

आम्ही एकमेकांचे व्यक्तीगत शत्रू नाही. आमची वैचारीक लढाई असू शकते. राहुल गांधी, असो सोनिया गांधी असो, ममता बॅनर्जी असो... हे सर्व या देशाचेच नेते आहेत ना. लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे ना?

तानाशाहीचा जो अर्थ आहे. तो आपल्या लोकशाहीमधून कुठून आला? असा सवाल उपस्थित करत मोदी सरकार वर निशाणा साधला तसंच सरकार ने सर्वाचं ऐकून देशाला पुढं घेऊन जायला हवं. असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Updated : 30 May 2020 11:19 AM GMT
Next Story
Share it
Top