Home > News Update > विविध मुद्दे, नव्या घोषणा आणि अनेक संकेत; आणखी काय होतं मोदींच्या भाषणात, वाचा

विविध मुद्दे, नव्या घोषणा आणि अनेक संकेत; आणखी काय होतं मोदींच्या भाषणात, वाचा

विविध मुद्दे, नव्या घोषणा आणि अनेक संकेत; आणखी काय होतं मोदींच्या भाषणात, वाचा
X

देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला. यासोबत नव्या योजनांचीही घोषणा केली. केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत बोलताना त्यांनी अनेक राजकीय विधानं केली. देशाच्या जनतेला भविष्याविषयी त्यांनी विश्वास देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले, वाचा

- सरकार आल्यानंतर अवघ्या १० आठवड्यांत कलम ३७० हटवलं. कलम ३५ अ रद्द करणे आणि तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

. तिहेरी तलाकच्या निर्णयाकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका

. तिहेरी तलाकची भीती मुस्लिम महिलांच्या मनातून हद्दपार केली

- सरकारने लहान व्यापाऱ्यांसाठी निवृत्तीवेतनासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले

- २०१४ साली मी देशवासियांसाठी नवीन होतो. त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर निराशा होती. लोकांना देश खरंच बदलू शकतो, का याविषयी साशंकता होती

- २०१९ ची निवडणूक फक्त मोदी नाही संपूर्ण देश निवडणूक लढवत होता

- आपण सतीप्रथा, भृणहत्या आणि हुंड्याची प्रथा बंद करू शकतो तर तिहेरी तलाकचे उच्चाटन का करू शकत नाही?

- लोकांचा विश्वास प्राप्त करण्यात सरकार यश आलं

- सतीप्रथेविरोधात, स्त्रीभ्रूण हत्येविरोधात कायदा आपण केला, मग मुस्लीम महिलांना जाचक ठरणाऱ्या तिहेरी तलाकवर कायदा करणंही जबाबदारी होती

- मी स्वत:साठी नव्हे तर तुमच्यासाठी काम करण्यासाठी पंतप्रधानपदी आहे.

- आज प्रत्येक भारतीय एक देश, एक संविधान हे गर्वाने म्हणू शकतो

- देशाचा एकोपा वाढवणारे निर्णय घेतले पाहिजेत

- देशाच्या मनात जे आहे ते करायला आलोय

- आता 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा झालीच पाहिजे.

- जीएसटीमुळे 'वन नेशन, वन टॅक्स' करण्यात यश

- 'जल जीवन मिशन' घेऊन सरकार काम करणार

- केंद्र आणि राज्य एकत्र करून ३.५ लाख कोटी 'जल जीवन मिशन' योजनेवर खर्च करणार

- भारताला जगात स्वत:चे स्थान निर्माण करायचे असेल तर गरिबीपासून मुक्तता मिळाली पाहिजे

- वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलं बोट

- गेल्या पाच वर्षांमध्ये गरिबीच्या उच्चाटनासाठी वेगाने प्रयत्न झाले

- कुटुंबनियोजनाचा विचार हीदेखील देशभक्ती

- भ्रष्टाचार करणाऱ्या काही बड्या अधिकाऱ्यांना आम्ही घरी बसवलं

- आधुनिक पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची गरज

- गेल्या पाच वर्षांमध्ये मी प्रत्येक दिवसाला एक अशाप्रकारे गरज नसलेले कायदे संपुष्टात आणले, एकूण १४५० कायदे रद्द

- देशात 'इज ऑफ लिव्हिंग' वाढवणे हे माझे उद्दिष्ट

- स्थिर सरकार, स्थिर प्रशासन असेल तर जग आपल्यावर विश्वास ठेवतं

- अफगाणिस्तानच्या १०० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मोदींनी दिल्या अफगाणिस्तानला शुभेच्छा

- आर्थिक वृद्धीसाठी देशात अत्यंत अनुकूल वातावरण

- मोठी स्वप्न बघायलाच पाहिजेत

- आमच्या सरकारने विकासही केला आणि महागाईही आटोक्यात ठेवली

- भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचा एकत्रितपणे विकास झाला पाहिजे

- मोदींचं प्लास्टिकमुक्तीचं आवाहन, दुकानदारांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशवी देणं टाळावं

- देश प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मोदींचे नागरिकांना आवाहन

- प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करण्याची गरज

- सणाच्या दिवशी एकमेकांना कापडाच्या पिशव्या भेट द्या

- २०२२ सालापर्यंत देशातील नागरिकांनी देशातील किमान १५ पर्यटन स्थळांना भेट द्यावी, असं आवाहन मोदींनी केलं.

- आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्या -

- शेतीमध्ये किटकनाशकांचा अतिवापर करून आपण जमिनीचा ऱ्हास करतोय -

- आपण रासायनिक खतांचा वापर २० ते २५ टक्क्यांनी केला तर मोठी देशसेवा होईल-

Updated : 15 Aug 2019 8:38 AM GMT
Next Story
Share it
Top