हवामान खात्याच्या ‘अंदाजपंचे’ मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याचे सर्वाधिक नुकसान होत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्याबाबत, कमी होत चाललेले वनक्षेत्र याविषयी शरद रणपिसे, भाई जगताप यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच राज्यातील कोणत्या भागात किती पाऊस पडेल की पडणारच नाही, याबाबत शेतकऱ्यांना अचूक माहिती देण्याबाबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, या संदर्भात विधान परिषद सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी,’अंशतः हे खरे आहे. पावसाचा आणि हवामानाचा अंदाज देण्याविषयीची बाब केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सूचना राज्यातील कृषीविद्यापीठे आणि जास्त्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यात येतात’, असे सरकारकडून उत्तर दिले.