“जीएसटी भवनची आग लागली की लावली?”

95

मुंबईतल्या जीएसटी भवनला लागलेली आग हा अपघाताने नव्हे तर त्यामागे घातपात असल्याचा आरोप मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे. ज्या मजल्याला आग लागली तिथे आयुक्तांचे कार्यालय होते. या जागी महत्वाच्या फाईल होत्या आणि त्या आगीत जळून गेल्या असाव्यात, त्यामुळे आग लागली की लावली याची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.  GST कमी जमा होत असल्याने काही लोकांची चौकशी सुरू होती, त्यामुळे त्या फाईल जाळण्याचा डाव असावा असा संशयही रवी राजा यांनी व्यक्त केला आहे.  GST भवन येथील दहावा मजला अनधिकृत आहे का याची माहिती आम्ही घेतो असे महापालिका प्रशासन सांगत आहे, त्यामुळे याचीही चौकशी व्हायला हवी आणि अनधिकृत बांधकाम केले जात असतांना महापालिकेला माहिती नव्हती का याचा खुलासाही करावा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

सोमवारी जीएसटी भवनला लागलेल्या आगीत या इमारतीचे दोन मजले जळून खाक झाले होते. या आगीतून शेकडो लोकांची सुटका करण्यात आली, अन्यथा मोठी दुर्घटना घडून मोठी जीवितहानी झाली असती.  दरम्याम मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होते, त्यामुळे आता अग्निशमन विभागानेही यावर कठोर पावलं उचलण्याची मागणी रवी राजा यांनी केली आहे.