Home News Update देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची सवय सोडावी – बाळासाहेब थोरात

देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची सवय सोडावी – बाळासाहेब थोरात

Courtesy :Social Media
Support MaxMaharashtra

शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकमत ला दिलेल्या एका मुलाखतीनंतर वाद निर्माण झाला होता. संजय राऊत यांनी पत्रकारितेतील अनुभव सांगताना

‘जेव्हा इंदिरा गांधी या मुंबईत यायच्या तेव्हा त्या करीम लाला याला भेटायच्या. त्याकाळी अंडरवर्ल्डच ठरवायचं की, सरकार कुणाचं असेल.’

राऊतांच्या याच वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. इंदिराजींसारख्या सर्वोच्च नेत्यावर आरोपानंतर काँग्रेस गप्प का? निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायची का? पोलिस आयुक्त अंडरवर्ल्डच्या संमतीने ठरवत होता काय? मुंबईत स्फोट घडविणार्यांंशी काँग्रेसचा काय संबंध? सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी उत्तर द्या…  असा सवाल केला होता.

यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवरायांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.  अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997