Home News Update मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची शाळा सुरू होण्यापूर्वीच पडण्याची भीती

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची शाळा सुरू होण्यापूर्वीच पडण्याची भीती

171
0
Support MaxMaharashtra

मागासवर्गीय मुलांचे भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी सरकारनं सामाजिक न्याय विभागामार्फत ग्रामीण भागात निवासी शाळा आणि वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मोठ्या निधीची तरतूदही केली.

पण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या अशाच एका शाळेची अवस्था पाहिल्यानंतर एखादा चांगला सरकरी निर्णय लालफितीमुळे कसा फसतो ते सिद्ध होत आहे. सामाजिक न्याय विभागाकडून वाळवा तालुक्यातील तुजारपूर इथे मागासवर्गातील शंभर मुलांसाठी निवासी शाळा आणि वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी तब्बल चार कोटी रुपये खर्च करण्यता आले आहेत. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारच्य या उद्देशालच हरताळ फासल्याचं दिसत आहे. इथे बांधलेली इमारत ही उद्घाटनापूर्वीच जमीनदोस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जागेची कोणत्याही प्रकारे तपासणी न करता त्या जागेवर बांधकाम केल्यामुळे बांधण्यात आलेली इमारत खचून गेली आहे. सुरुवातीला या जागेवर कोणत्याही प्रकारे बांधकाम करता येणार नाही असा अहवालही आला होता, तरीही नंतर त्याच जागेवर इमारत बांधण्यात आली, या व्यवहारात अधिकारी व ठेकेदार यांचे हितसंबध गुंतले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

एवढी भव्य इमारत बांधूनही ती आता निरुपयोगी ठरली आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. ही जागा बांधकाम करण्यासाठी योग्य नसल्याचे इथले स्थानिक गावकरी सांगत होते पण त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकरी करत आहेत.


यासंदर्भात आता संभाजी ब्रिगेडच्या सुयोग औंधकर यांनी सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार दिली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर सार्वजनिक विभागाचे उपअभियंता तुषार शिरगुपे यांनी या इमारतीला थर्ड पार्टी ऑडिट लावून तपासणीचे काम चालू आहे. या थर्ड पार्टीचा जो अहवाल येईल तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून जे कोणीही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997