Home News Update “कुछ जंग सिर्फ इसलिए लड़ी जाती हैं, ताकि दुनिया को पता चले,...

“कुछ जंग सिर्फ इसलिए लड़ी जाती हैं, ताकि दुनिया को पता चले, कोई है, जो लड़ रहा है”

एनडीटीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना काल आशिया खंडाचे नोबेल समजल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिलिपीन्सची राजधानी मनीलामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
“हर जंग जीतने के लिए नहीं लड़ी जाती, कुछ जंग सिर्फ इसलिए लड़ी जाती हैं, ताकि दुनिया को बताया जा सके, कोई है, जो लड़ रहा है” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी केलेल्या भाषणात भारतातल्या माध्यम स्वातंत्र्यापासून ते जम्मू काश्मीरपर्यंत अनेक मुद्द्यांना हात घातला.
आज देशात शिक्षणाचा प्रसार झाला असला तरी चांगलं शिक्षण काही शहरांपूरतंच मर्यादित आहे. गावखेड्यात असलेल्या अशा अज्ञानाचे काय गंभीर परिणाम होतील याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यांच्यासाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हाच माहितीचा स्रोत आहे. देशातल्या युवकांना चांगलं शिक्षण मिळत नाहीय, त्यामुळे त्यांना दोष देण्यात अर्थ नाही असं रवीश यांनी म्हटलं.
भारतातील मीडिया संकटात आहे आणि हे संकट अचानक आलेलं नाही. कोणत्या दबावाला बळी न पडता आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारांना माध्यम संस्था आणि त्यांच्या कॉर्पोरेट एक्झिक्यूटीव्ह नोकऱ्या सोडण्यासाठी भाग पाडत आहे. पत्रकार असणं आता एक वैयक्तिक लढाई झालेली आहे. असं असलं तरी काही पत्रकार नोकरीची आणि जीवाची पर्वा न करता पत्रकारिता करत आहेत हे पाहून दिलासा मिळतो असं रवीश म्हणाले.
जोपर्यंत बातम्यांमध्ये वास्तव मांडलं जातंय तोपर्यंतच लोकशाही टिकू शकेल असा इशारा देतानाच युवा पत्रकार या क्षेत्राला गांभीर्याने बघत आहेत आणि ते माध्यमांची वाईट होत चाललेली प्रतिमा बदलतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997