Home मॅक्स रिपोर्ट राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा उद्या शुभारंभ…

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा उद्या शुभारंभ…

आगामी २०१९ च्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. १० जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा चालणार असून सरकारचा भ्रष्टाचार, अनेक गंभीर चूका, आत्तापर्यंत झालेले घोटाळयांचे आरोप, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश, नागरी वस्त्यांमधील नियोजनाचा अभाव, घनकचऱ्याचा प्रश्न आणि चार वर्षात पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन केलेली लूट, असे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीदवाक्य घेवून परिवर्तन संपर्क यात्रा काढत आहे.
 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून या परिवर्तन यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. तर पहिली सभा सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे.
या परिवर्तन संपर्क यात्रेमध्ये विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह इतर सर्व नेते सहभागी होणार आहेत.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997