Home News Update कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कायम?

कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कायम?

Support MaxMaharashtra

राज्यातील मुख्यमंत्री (CM) पदाचा तिढा सुटला असला तरी उपमुख्यमंत्री पदाचा तिढा अजुनही कायम आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मध्ये उपमुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच कायम आहे. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) गटातील आमदारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कॉंग्रेसला (Congress) अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद अशी पदाची वाटणी करण्यात आली असल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. मात्र, ही वाटणी कॉंग्रेसला मान्य नसल्याचं समजतंय.

हे ही वाचा…

संजय राऊत यांच्या कसोटीचा दिवस
विश्वासदर्शक ठरावासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक
विकासदर ४.५ टक्क्यांवर; गत सहा वर्षातील सर्वात निचांकी दर 

सुरुवातीला राष्ट्रवादीकडून (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल असे संकेत राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी दिले.

त्यानंतर कॉंग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर दावा केला. उपमुख्यमंत्री पदावरुन नाराज झालेली कॉंग्रेस आजच्या विश्वास मत ठरावात कॉंग्रेस सरकारला बाहेरुन पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावरुन कुठलाही मतभेद नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997