‘हे’ ट्विट करुन उदयनराजे गेले भाजपात…

‘हे’ ट्विट करुन उदयनराजे गेले भाजपात…

3722
0
Courtesy : Social Media
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण भाजप पक्षात अधितकृतपणे प्रवेश करणार असल्याचं आपल्या ट्वीटर पेजवर जाहीर केले आहे. काल शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या प्रदीर्घ चर्चेनंतर उदयराजे यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवास थांबवला आहे.
उदयनराजे भोसले उद्या दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत.
ट्वीटरवरील आपल्या पोस्ट मध्ये उदयन राजे म्हणतात की, “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या आणि आशिर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम आणि आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.”