Home News Update राजीनाम्याबाबतच्या चर्चांना राणा जगजीतसिंह पाटील यांचं उत्तर

राजीनाम्याबाबतच्या चर्चांना राणा जगजीतसिंह पाटील यांचं उत्तर

मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही, मी जे करतो ते उघड करतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. राणा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर राणा यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.
राणा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर बकरी ईदच्या शुभेच्छा देताना नावापुढे आमदार असा उल्लेख केला नाही आणि गेल्या काही दिवसांत राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. अनेक माध्यमांनीही याबाबत बातम्या प्रकाशित केल्या होत्या.
अशा बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी मला एक फोन करून विचारलं असतं, तर त्याची सत्यात समोर आली असती असंही राणा यांनी म्हटलंय. याप्रकारे तथ्यहीन बातम्या पसरवून कोणी तरी याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997