राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत

कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदत निधीचा सुमारे ५० लाखांचा धनादेश देण्यात आला. शिवाय पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतच्या २५ विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज ही मदत देण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदी नेते उपस्थित होते.