‘संभाजी भिडे गुरुजी यांची ISRO च्या प्रमुख पदी नेमणूक करा’: राष्ट्रवादीची मागणी

‘संभाजी भिडे गुरुजी यांची ISRO च्या प्रमुख पदी नेमणूक करा’: राष्ट्रवादीची मागणी

अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी केलं होतं. “भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एक सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतही भारतीय कालमापन पद्धतीत आहे” असं वक्तव्य मनोहर भिडे यांनी केलं होतं. भिडे यांच्या मते “अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा उपयोग केला म्हणूनच अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली” असं वक्तव्य मनोहर भिडे यांनी सोलापूर इथं केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित सुनील तळोकार यांनी मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची ISRO च्या प्रमुख पदी नेमणूक करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
प्रति,
श्री. नरेंद्र मोदीजी
पंतप्रधान, भारत गणराज्य.
विषय :- अध्यात्मिक गुरू श्री मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची ISRO च्या प्रमुख पदी नेमणूक करण्याबाबत मागणी.
महोदय,
मी परीक्षित सुनील तळोकार राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस पदी काम करतो. ह्या पत्राद्वारे मी सांगलीतील जेष्ठ शास्त्रज्ञ श्री.संभाजी भिडे गुरुजी यांची ISRO च्या प्रमुख पदी तात्काळ नेमणूक करण्यात यावी ह्या साठी पत्र लिहीत आहे.
काल भिडे गुरुजी यांनी ‘अमेरिकेनी त्यांचं यान एकादशीला सोडल्या मुळे त्यांना यश आलं’ असं म्हंटल्याचं वृत्त आहे.
असं असल्यास भारताच्या उज्वल भविष्यासाठी संभाजी भिडे यांची ही नियुक्ती करण्यात यावी . श्रीहरिकोटा मधील सगळी सूत्र त्यांच्या हाथी गेल्यास ते पंचाग बघून पुढचा कार्यक्रम ठरवतील व थोड्याच दिवसात भारताची ISRO ही संस्था अमेरिकेच्या NASA ह्या संस्थेपेक्षा अव्वल ठरेल.
साहेब, ह्या मागणीचा विचार करावा ही आपणास विनंती करतो.
आपलाच ,
परीक्षित तळोकार
सरचिटणीस , राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस पुणे