विधानसभा निवडणुक 2019: शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट

विधानसभा निवडणुक 2019: शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट

Courtesy : Social Media
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र आली आहेत. त्यानंतर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची पहिल्यादांच भेट घेतली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या दृष्टीकोनातून चर्चेसाठी ही भेट घेण्यात आल्याचं समजतंय. मात्र, अवघ्या 15 मिनिटात ही भेट संपली.
महाराष्ट्राच्या छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांची आज सोनिया गांधी यांच्याशी भेट ठरली होती. मात्र, ही भेट रद्द झाली असून पुढे ढकलण्यात आली आहे.