Home मॅक्स रिपोर्ट मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात हर्षल राऊत या तरूणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर येथील निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला.
या कर्मचाऱ्यांना २००२ मध्ये महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनंतर पालिका प्रशासनाने त्यांना अद्यापपर्यंत सेवेत घेतले नसल्याने या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा इशारा दिला होता.
त्यानंतर आज चौघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्या करण्यासाठी त्यांच्या घराकडे जाण्याची प्रयत्न केला. त्यातील एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रोखले. तसंच त्याच्यासह इतर तीन जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान धर्मा पाटील आणि हर्षल राऊत यांच्या आत्महत्येनंतर या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहत वेळीच या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997