Home News Update नागपूर : महिला डॉक्टरवर फेकलं अ‍ॅसिड

नागपूर : महिला डॉक्टरवर फेकलं अ‍ॅसिड

Support MaxMaharashtra

एकतर्फी प्रेमातून हिंगणघाटच्या मुलीला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना एका मुलीवर अ‍ॅसिड फेकण्यात आल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. सावनेर तालुक्यातील पेहेलेपार गावात ही घटना घडली आहे. एचआयव्ही सर्वेक्षणासाठी महिला डॉक्टर पेहेलेपार या गावात आली होत्या. सर्वेक्षणाचं काम सुरु असतांना अचानक एका माथेफिरुनं डॉक्टरच्य़ा दिशेने अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला.

महिला डॉक्टरवरील एसिड हल्ल्यामागे कारण काय?

महिला डॉक्टरवरील एसिड हल्ल्यामागे कारण काय?एकतर्फी प्रेमातून हिंगणघाटच्या मुलीला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना एका मुलीवर एसिड फेकण्यात आल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. सावनेर तालुक्यातील पेहेलेपार गावात ही घटना घडली आहे. पाहा व्हिडीओ…#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 13 फ़रवरी 2020

या हल्यात ही महिला डॉक्टर थोडक्यात बचावल्या आहेत. मात्र एक अल्पवयीन मुलगी आणि एक महिला या हल्ल्यात किरकोळ जखमी झाली आहे. दारुच्या नशेत या आरोपीने हे कृत्य केल्याचा संशय आहे. आजूबाजूच्या लोकांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

हल्लेखोराचं नाव निलेश कन्हेरे असून तो २२ वर्षांचा आहे. या आरोपीने य़ा डॉक्टरवर एसीड फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, तसंच  यात प्रेमकरणाचा संबंध नसल्याचं नागपूर पोलिसांनी सांगीतलय. आरोपीची चौकशी सुरु आहे, पण तो दारुच्या नशेत असल्याने चौकशीला वेळ लागत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997