मुंबई, पुण्यातील मार्डचे डॉक्टर संपावर

0Shares
कोलकात्यामध्ये एनआरएस वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी एक दिवसांचा संप पुकारला आहे. मुंबई, पुण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून पुण्यातली बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डचे डॉक्टरही या संपात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. तातडीची वैद्यकिय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद राहणार आहेत. याबाबतची माहिती बीजे मार्डचे सचिव डॉ. अभिषेक जैन यांनी दिली आहे.
कोलकात्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात पसरले आहेत. त्यानिमित्त देशातील इंडियन मेडिकल असोसिएशन संघटना या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्याचबरोबर मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला असल्याने रुग्णांना ससूनमध्ये तातडीच्या वगळता कोणत्याही सेवा दिल्या जाणार नाहीत. .