अंधेरीमध्ये संरक्षण भिंत कोसळली

अंधेरीमध्ये संरक्षण भिंत कोसळली

मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून २१ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आता अंधेरी इथल्या पेपर बॉक्स इमारतीची भिंत कोसळलीय. सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी (८ जुलै) दुपारी 12 च्या सुमारास महल औद्योगिक परिसरात ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.