दरवर्षी पाऊस येतो आणि आमच्या तोंडाचा घास घेऊन जातो…

दरवर्षी पाऊस येतो आणि आमच्या तोंडाचा घास घेऊन जातो…

50
0

मुंबईकरांना मुसळधार पाऊस काय नवीन गोष्ट नाही. मात्र,या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून मुंबई ही सारखी तुंबत असते. मुंबईच्या किंग सर्कल, गांधी मार्केट, हिंदमाता, मिलन सबवे आणि अंधेरी सबवे अशा मुंबईतल्या काही सखल भागात पाणी साचते. आणि मुंबई ठप्प होते. वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं.

या वारंवार होणाऱ्या मुंबईच्या तुंबई मुळे सामान्य मुंबईकर हैराण आहेत. कारण जवल जवळ प्रत्येक मुंबईकरांना कामासाठी घरातून दररोज बाहेर पडावं लागतं. मुंबईतल्या लोकांना या मुसळधार पावसामुळे कामावर येण्या-जाण्यासाठी जो अडथळा निर्माण होतो. तो खूप मोठा असतो. मुंबई ची लाईफ लाईन मानली जाणारी मुंबई रेल्वे ही मुसळधार पावसामुळे सारखी बंद पडत असते. त्यामुळे सामान्य मुंबईकर त्रस्त होतात. त्यातच वारंवार मुंबई तुंबत असताना प्रशासन त्याच त्याच भागात पाणी साचत असताना देखील हे पाणी साचू नये म्हणून योग्य ती भूमिका घेत आहे की नाही? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

प्रत्येक पावसाळ्यात मुंबई साधारण दोन-तीन वेळा तर बंदच होतेच. त्याचा फटका सामान्य दुकानदार, व्यावसायिक, नोकरदार यांना बसतो. आम्ही या संदर्भात एका व्यवसायिकशी बातचित केली. त्यांचे दुकान गांधी मार्केट येथे आहे. त्यांनादेखील या वारंवार पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या दुकानाच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचत आणि त्यामुळे दुकान बंद करावं लागतं. यात त्यांना मोठा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो.

दुकानदार सुरजित सिंग चौधरी बोलतात की… ही दरवेळेस च्या पावसाची अशीच परिस्थिती आहे. इथे आमच्या दुकानाच्या आजूबाजूला पाणी साचते. त्यामुळे हे पाणी दुकानाच्या आत पण पाणी येतं. त्यामुळे आमच्या मालाचं खूप मोठं नुकसान होतं. संपूर्ण पावसाळ्यात लाखो रुपयांचं नुकसान होतं. इथे महापालिकेचे कमिशनर पाणी भरण्याचा आढावा घेऊन गेले आहेत. तरी देखील ही परिस्थिती सुधारण्याची काही चिन्हे नाही आहेत. आमचं या सर्व प्रकरणात लाखों रुपयाचं नुकसान होत आहे. याची भरपाई कोण करणार? असा सवाल व्यापाऱ्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला आहे.

सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. अशीच परिस्थीती मुंबईतील दुकानदारांची आहे. त्यामुळे शासनानं लक्ष द्यावं अशी इच्छा व्यापारी व्यक्त करत आहे. पावसाचं पाणी मुंबईत शिरल्यानं नुकसान होणाऱ्या या व्यापाऱ्याशी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी संवाद साधला…