ओला-उबर टॅक्सीविरोधात उद्यापासून ऑटोरिक्षा चालक – मालक संपावर

ओला-उबर टॅक्सीविरोधात उद्यापासून ऑटोरिक्षा चालक – मालक संपावर

उबेर, ओला या खासगी टॅक्सीची सेवा तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेनं उद्यापासून (९ जुलै) बेमुदत संप पुकारला आहे. राज्यातील ऑटोरिक्षा चालक – मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीने हा संप पुकारलाय.

ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या मागण्या

– राज्यात ऑटोरिक्षा विम्यामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तात्काळ कमी करण्यात यावी.
– विमा कंपनीत भरले जाणारे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरावे
– ऑटोरिक्षाचे भाडे हकीम कमिटीच्या शिफारशीनुसार वाढवण्यात यावे.
– ओला, उबेर, टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी.
– अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक असावं.
– ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांसाठी राज्य सरकारने कल्याणकारी मंडळाची स्थापना       केली आहे, हे मंडळ परिवहन खात्यातंर्गत असावे.