भारत पेट्रोलियमचा काही हिस्सा रिलायंस विकत घेणार, कामगार संतप्त

भारत पेट्रोलियमचा काही हिस्सा रिलायंस विकत घेणार, कामगार संतप्त

142
0
Courtesy : Social Media

भारत पेट्रोलियमचा काही हिस्सा मुकेश अंबानीची मालकी असलेल्या रिलायन्स इंडिस्ट्रीज लिमिटेड RIL विकत घेणार असल्याचं वृत्त विविध माध्यमांनी दिलं आहे.

जपानच्या स्टॉकब्रोकर नोमुरा रिसर्च ने आपल्या अहवालात रिलायंस इंडस्ट्रीज व्यतिरिक्त सरकारी क्षेत्रामध्ये आणखी एका तेल कंपनी इंडियन ऑयल कॉपोरेशन ने बीपीसीएल मध्ये काही हिस्सा खरोदी करण्यासाठी इच्छूक असल्याचं समजतंय. मध्यंतरी गुंतवणूकी संदर्भात असलेल्या कोअर कमिटीने बीपीसीएल ची असलेली हिस्सेदारी (53.29 टक्के) विकण्याची शिफारस केली होती.

नोमुराच्या अहवालानुसार आता सचिव स्तरावर सरकार बीपीसीएल कंपनीची पूर्ण हिस्सेदारी विकण्यास तयार झाली असून आता फक्त कॅबिनेटची मंजूरी बाकी आहे.

तसा विचार केला तर, ज्या कायद्यानुसार बीपीसीएल चे राष्ट्रीयकरण झाले होते. तो कायदा आता हटवण्यात आला आहे. त्यामुळे बीपीसीएल ची हिस्सेदारी विकताना कोणतीही अडचण येणार नाही.

गुंतवणूकदारांना पाठवण्यात आलेल्या नोट्स नुसार रिलायंस रिफाइनिंग/ केमिकल आपला हिस्सा कमी करुन कंपनीवरील कर्ज शुन्यावर आणू इच्छिते. तरीही बीपीसीएल ची हिस्सेदारी घेण्यासाठी रिलायंस बोली लावू शकते.