संभाजीराजेंची पुरग्रस्तांना ५ कोटींची मदत

संभाजीराजेंची पुरग्रस्तांना ५ कोटींची मदत

खासदार संभाजीराजे यांनी आपल्या खासदार निधीतून पूरग्रस्तांसाठी ५ कोटी दिले आहेत. “माझ्या निधीतून ५ कोटी रुपये या पूरग्रस्त गावांत खर्च करण्याचा मी संकल्प करतोय. माझ्या रयतेच्या सेवेकरता हे काहीच नाही. समाजसेवेसाठी माझं संपूर्ण जीवन समर्पित आहे,’’ असं संभाजीराजेंनी म्हटलंय.
खासदार संभाजीराजे छत्रपती हे पहिल्या दिवसापासून पूरग्रस्त भागात जाऊन लोकांची मदत करत आहेत. या महापूरामध्ये अनेक गावं संसार उध्दवस्त झाली आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. अनेक गावातीलं पाणी ओसरत असले तरी शिरोळसारख्या अनेक तालुक्यांची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. हे नुकसान भरुन काढणे हे सर्वांसमोरचं आव्हान असणार आहे.