Home मॅक्स रिपोर्ट ‘मुस्लिमबहुल असल्यानेच मोमीनपुऱ्याचा विकास नाही’

‘मुस्लिमबहुल असल्यानेच मोमीनपुऱ्याचा विकास नाही’

182

‘कसं काय महाराष्ट्र?’ या निवडणूक विशेष दौऱ्यामध्ये आम्ही नागपूर शहरातला मोमीनपुरा या भागात गेलो. नागपूरचा मध्यवर्ती भाग असला तरी मोमीनपुरा हा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. यातला बराचसा भाग हा बाजारपेठेचा आहे. त्याठिकाणी अरुंद रास्ते, अतिक्रमण याचा त्रास व्यापाऱ्यांना होत असतो.

मोमीनपुरा भागातल्या अनेक छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना परखड मतं मांडली. केवळ मुस्लिमबहुल भाग असल्याने मोमीनपुऱ्याचा विकास होत नसल्याचा आरोप एका व्यापाऱ्याने केला. आर्थिक मंदी, बेरोजगारी, देशातलं आणि राज्यातलं सामाजिक वातावरण याबद्दल मोमीनपुऱ्यातील रहिवासी मोकळेपणाने व्यक्त झाले. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट…

Support MaxMaharashtra

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997