कांदिवली पुर्व विधानसभेचा विकास झालेलाच नाही – हेमंत कांबळे, मनसे

कांदिवली पुर्व विधानसभेचा विकास झालेलाच नाही – हेमंत कांबळे, मनसे

आमदार, नगरसेवक, खासदार दर पाच वर्षांनी बदलत असतात परंतु, अनेक वर्ष लोटुनही या परिसराचा हवा तसा विकास होत नाही असं कांदिवली पुर्वचे मनसे उमेदवार हेमंत कांबळे बोलत होते.

“लोकांना समाधान वाटेल असा विकास झालेला नाही. कांदिवली मध्ये ४० वर्ष वावरत असताना काही गोष्टी अशा जाणवतात की, येथील जनतेला चांगले रस्ते, इमारत आणि झोपडपट्टीचे पुनर्वसन इत्यादी गंभीर प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी मला मनसे पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. तसेच माझ्यासोबत मनसैनिक निष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे २१ तारखेला नक्की यश मिळेल.” असे हेमंत कांबळे बोलत होते.