आमदार यशोमती ठाकूर यांची काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड

आमदार यशोमती ठाकूर यांची काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची शनिवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यशोमती ठाकूर ह्या काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यंग बिग्रेटच्या असून या आधी यशोमती ठाकूर यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली होती. तर मेघालय व कर्नाटक या दोन राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती.

यशोमती ठाकूर ह्या काँग्रेसच्या विदर्भातील एकमेव महिला आमदार त्या आहेत. काँग्रेस पक्षाने राज्याच्या विधानसभेच्या कामकाजाच्या काँग्रेसच्या नेत्या म्हणून त्यांची ही निवड महिन्याभरापूर्वी करण्यात आली होती.

शनिवारी काँग्रेस पक्षाने यशोमती ठाकूर यांना आणखी जबाबदारी देत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

तर विविध जबाबदारी त्यांना देण्यात आल्या आहेत. यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ ग्रामीण असून काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय व  राज्य पातळीवरील जबाबदारी त्यांना दिली आहे.