Home Election 2019 आमदार बच्चू कडूंना शेतकऱ्यांसह अटक

आमदार बच्चू कडूंना शेतकऱ्यांसह अटक

Support MaxMaharashtra

शेतकरी प्रश्नावर आमदार बच्चू कडू आज राज भवनावर मोर्चा काढणार होते. मात्र, त्या अगोदरच आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या राज्यावर ओल्यादुष्काळाचं सावट आहे. अशा परिस्थित राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करुन प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 25 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

तसंच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना देखील पीक विम्या कंपन्यांनी कुठलीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. त्यामुळं आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत सध्या राष्ट्रपती राजवट असल्यानं राजभवनावर शेतकऱ्य़ांचा मोर्चा काढला होता. मात्र, त्यांच्या सह शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी हवालदिल असून त्यातच राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांचा राज भवनावर मोर्चा,पोलिसांनी घेतलं ताब्यात

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांचा राज भवनावर मोर्चा,पोलिसांनी घेतलं ताब्यात#maxmaharashtra #bachchukadu

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 14 नवंबर 2019

ओला दुष्काळ जाहीर करा, आझाद मैदानावर शेतकऱ्यांचं आंदोलन….आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया…

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 14 नवंबर 2019

 

 

 

 

 

 

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997