Home मॅक्स रिपोर्ट न्याय द्या नाहीतर सहकुटुंब आत्महत्या करू! भार्गवीच्या आईवडिलांचा टाहो

न्याय द्या नाहीतर सहकुटुंब आत्महत्या करू! भार्गवीच्या आईवडिलांचा टाहो

Support MaxMaharashtra

भार्गवी दुपारे हिचा १३ जून रोजी मुंबईतील सपना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समजलेलं नाही. भीम आर्मी १३ तारखेला या संदर्भात पंतनगर पोलीस स्टेशनला आंदोलन करणार आहे.

भार्गवी दुपारे ही मेडिकलच्या पहिल्या वर्षाला शिकणारी विद्यार्थिनी होती. पोटात दुखू लागल्यामुळे तिला १३ जुनला सपना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या गोष्टीला आता सुमारे ४ महिने झाले पण भार्गवीच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलेलं नाही. जर सपना हॉस्पिलच्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री दालनामध्ये आत्महत्या करू असा इशारा भार्गवीच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

भार्गवी दुपारे हिची आई विद्या दुपारे यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’ला सांगितलं की, १३ जुनला भार्गवीच्या पोटात दुखू लागल्यामुळे आम्ही तिला सपना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू. एवढ्या दिवसांत आम्हाला तिच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलेलं नाही. पोलीसही कोणत्यातरी प्रभावाखाली हे काम करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

ही घटना घडल्यांनंतर अनेक महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांना यासंदर्भात तपस लावण्यात अपयश आलं आहे. तपास लागत नसल्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असे गंभीर आरोप दुपारे कुटुंबियांनी केला आहे.

पोलीस आधीपासूनच हे प्रकरण घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास देखील नकार दिला होता असं भार्गवीची मैत्रीण प्रिया गायकवाड हिने सांगितलं.

भार्गवीचं कुटुंब न्याय मागत आहे. भार्गवीचे भाऊ स्नेहदीप दुपारे म्हणाले की, भार्गवीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. सपना हेल्थ केयर सेंटर हे रुग्णालय बंद करावं अन डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन जर असं झालं नाही तर आम्ही मुख्यमंत्री दालनात आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

१३ जूनला भार्गवीच्या वडिलांचा जबाब हा संगणीकृत केला होता. अन त्यावर तपास करण्यासाठी असणार सॅम्पल हे लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे पण २ ते ३ महिने उलटले तरीही याचा अहवाल पोलीस स्टेशन मध्ये आला नाही.

पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भालेराव यांनी सांगितलं की नरेश दुपारे यांची मुलगी भार्गवीच्या पोटामध्ये दुखू लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांचा जबाब आम्ही नोंदवून घेतला आहे. जे काही सॅम्पल होते ते सगळे आम्ही टेस्ट करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. जोपर्यंत त्याबाबत अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही डॉक्टरवर गुन्हा दाखल करू शकत नाही. जर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असा अहवाल जर आला तर आम्ही डॉक्टरवर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करू.

भार्गवीला न्याय मिळावा म्हणून भीम आर्मी १३ नोव्हेंबर ला पंतनगर पोलीस स्टेशनला आंदोलन करणार आहे. भीम आर्मीचे सदस्य मधू पवार यांनी सांगितलं की, भार्गवीचं कुटुंब न्याय मागण्यासाठी धडपडत आहे. ३ ते ४ महिने झाले तरी भार्गवीला न्याय मिळाला नाही. अजूनही तिच्या मृत्यूचं कारण समजत नाही. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का, याचं कारण समजावं आणि डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997