Home > मॅक्स वूमन > मुख्यमंत्री आपला वेळ पक्षात कुणाला आणायचे यामध्ये घालवत आहेत – सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री आपला वेळ पक्षात कुणाला आणायचे यामध्ये घालवत आहेत – सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री आपला वेळ पक्षात कुणाला आणायचे यामध्ये घालवत आहेत – सुप्रिया सुळे
X

महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव, देश बचाव सभेनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी “आपण सर्वांनी दुष्काळ निवारणासाठी नैतिक जबाबदारी म्हणून योगदान द्यावे,” असे आवाहन केले.

पुढे त्या म्हणाल्या की, “राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थीवर काय उपाययोजना करायच्या, नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या दुष्काळाच्या झळा कमी कशा कराव्यात, हा विचार सोडून मुख्यमंत्री आपला वेळ राजकारणासाठी आणि पक्षात कुणाला आणायचे, यावर खर्च करत आहेत. त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीशी आणि जनतेशी काही देणे घेणे नाही. दुष्काळ निवारणासंदर्भात सरकार उदासीन आहे,” असे बोलून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली.

Updated : 30 Oct 2018 7:35 PM IST
Next Story
Share it
Top