तिची नथ पोहोचली साता समुद्रापार
X
स्त्रियांना अलिकडे फॅशनबल दागिने आवडतात. पारंपरिक दागिण्यांकडे स्रिया दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळते. असे असले तरी मराठ मोळ्या अनुजा मुळे यांनी आपल्या संस्कृतीचे प्रतिक असलेली नथ ही साता समुद्रापार नेली आहे. कँलिफोर्निया येथे Santa Clara University झालेल्या पदवी दान समारंभात त्यांनी आवर्जुन नथ परिधान केली होती.
त्यामुळे ही नथ या कार्यक्रमाचे आकर्षण व कुतुहालाचा विषय ठरला. MaxWoman ने त्यांच्याशी संर्पक केला असता त्यांनी सांगितले की “खरतर मुलींनी शिक्षण घ्यावे आपला विकास नक्कीच करावा. मात्र या बरोबर त्यांनी आपल्या पोषाख सोडलाच पाहिजे असे नाही. विचारांनी आधुनिक होणे जास्त महत्वाचे. इतिहासात आपण डोकावले तर आपल्या लक्षात येईल की सावित्रीबाई यांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. मात्र पोषाख तोच ठेवला. त्यामुळे विचारांना महत्व दया आणि आपल्या आवडी व गरजे प्रमाणे पोषाख निवडा. पूर्वीच्या काळी नथ ही सततच्या वापरातील होती. आज ती कुठेतरी हरवत चालली आहे. महाराष्ट्राचे प्रतिक असे हरवता कामा नये म्हणून या नथीचा समावेश मी माझ्या पदवीदान समारंभातही केला.” स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या आजीने शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी या संदर्भात लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.
अनुजा यांनी Electrical इंजीनियरिंगच्या मास्टर्ससाठी प्रवेश घेतला तेव्हा त्यांच्या मुलीचा रूमानीचा जन्म झाला होता. मात्र कुटुंबाचे पाठबळ व त्याबरोबरीनेच मुलीला कॉलेजने कॉलेजमध्ये घेऊन येण्याची परवानगी दिली त्यामुळे हे शक्य झालं असं त्या सांगतात. आपल्या मुलीसह कॉलेजचा हा केलेला प्रवास सुखद होता. हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. स्त्रियांनी त्या स्त्री आहेत म्हणून किंवा गृहीनी आहे म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.