अमृता फडणवीस यांनी दिल्या सामनाच्या ‘नव्या संपादकां’ना शुभेच्छा

MaxMaharashtra, Rashmi Tackeray, sanjay raut, amruta fadnavis, news, Woman's News

दैनिक सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याकडे कोणतंही लाभाचं पद असता कामा नये. म्हणून सामना च्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता सामना ची सर्व जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडं आली आहे. विशेष बाब म्हणजे रश्मी ठाकरे यांच्याकडे सामना ची जबाबदारी आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

‘’तुमची निवड झाल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च नेतृत्त्वपदी महिला असणं ही आपल्या देशाची गरज आहे. तरच आपल्या समाजात असलेल्या इतर महिलांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळेल. तसेच महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळेल,”
असं म्हणत रश्मी ठाकरे यांचे अभिनंदन केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळं अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरे यांचं अभिनंदन केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काय म्हटलं होत अमृता फडणवीस यांनी..

“कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातलं गमक कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे.”
MaxMaharashtra, Rashmi Tackeray, sanjay raut, amruta fadnavis, news, Woman's News
असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘बांगड्या घातल्या नाहीत’ या वक्तव्यावर टीका करतांना त्यांनी माफी मागावी असं म्हटलं होतं. यावर अमृता फडणवीस यांनी आदित्य यांच्यावर चांगलंच तोंड सुख घेतलं होतं.